राज्यपालांना शरद पवारांचा सणसणीत टोला; म्हणाले, वादग्रस्त वक्तव्य करणे...

राज्यपालांना शरद पवारांचा सणसणीत टोला; म्हणाले, वादग्रस्त वक्तव्य करणे...

मुंबई | Mumbai

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातारवण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे...

शरद पवार म्हणाले की, राज्यपाल जेव्हा बोलले तेव्हा मी व्यासपीठावर होतो. नितीन गडकरी आणि मी व्यासपीठावर असताना त्यांनी तो उल्लेख केला. या राज्यपालांचे वैशिष्ट्य आहे की, अनेक गोष्टींवर वादग्रस्त वक्तव्ये करणे हा त्यांचा लौकिक आहे. चुकीचे विधाने करणे, समाजामध्ये गैरसमज वाढेल याची खबरदारी घेणे असेच त्यांचे मिशन आहे का? ही शंका येते.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसह छत्रपतींबाबतचा उल्लेख या सर्व गोष्टी सांगतात की, या पदावर जबाबदारीने भूमिका घ्यायची असते याची समज नसलेली व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. शिवछत्रपींच्या बद्दलचा उल्लेख पाहिल्यानंतर त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत.

काल त्यांनी शिवाजी महाराजांचे कौतुक केले. पण हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिक्रिया पाहून सुचलेले शहाणपण आहे. मला वाटते की याचा निर्णय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. अशा व्यक्तीकडे जबाबदाऱ्या देणे योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com