नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही - शरद पवार

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही - शरद पवार

बारामती / Baramati - काँग्रेस सतत स्वबळाचा नारा देत असल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बिघाडी झाल्याची सध्या चर्चा आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress chief Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (deputy chief minister Ajit Pawar) टीका टीका केल्याने त्यात भर पडली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पहिल्यांदाच टीका

महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आधीपासून धुसफूस आहे. निधी वाटपापासून ते राष्ट्रवादीलाच सन्मान मिळत असल्यापर्यंतच्या विविध कारणामुळे महाविकास आघाडीत ठिणग्या उडाल्या. शिवाय स्वबळाचा नारा देण्यावरूनही महाविकास आघाडीत तू तू मै मै आहे. मात्र, अद्यापपर्यंत आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी कुणाही विरोधात वैयक्तिक नाव घेऊन टीका केली नव्हती. मात्र, दोन वर्षात पहिल्यांदाच शरद पवार यांनी थेट पटोलेंवर टीका केली आहे. पटोलेंच्या विधानाला आपण किंमत देत नसल्याचंही पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचंही या निमित्ताने अधोरेखित झालं आहे.

पटोले काय म्हणाले होते?

पटोले लोणावळ्यात होते. एका मेळाव्याला संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे बारामतीचे, मात्र कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या ते कामाला येत नाहीत. तर आपल्याला काही बोलायचंच नाही. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, एकत्र राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल, त्या त्रासालाच तुम्ही आपली ताकद बनवा, मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com