सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात, सगळेच माझ्यासारखे नसतात

शरद पवारांचा फडणवीसांना टोला
सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात, सगळेच माझ्यासारखे नसतात
शरद पवार

पुणे |प्रतिनिधी| Pune

सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच (Election) काही लोकांनी ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष (Fault) देणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा काढला. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सत्ता येते आणि जाते…पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा (Announcement) त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही याची अस्वस्थता असते. पण या सर्वांना या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

आपल्या धार्मिक भावना अंत: करणात ठेवाव्यात

प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना अंत: करणात ठेवाव्यात, घरात ठेवाव्यात. धार्मिक भावनांचं जाहीर प्रदर्शन करु नये. त्याच्या आधारावर अन्य घटकांच्या संबंधी एकप्रकारचा द्वेष निर्माण होऊन त्याचे परिणाम समाजावर दिसू लागतात. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं, " असे ते म्हणाले.

अलिकडच्या काळात राज्यात व्यक्तिगत गोष्टी होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात सत्ताधारी - विरोधक यांच्यावरील टीका ही भाषणापुरती मर्यादित होती. ही परंपरा यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्यापासून सुरु होती. विधीमंडळात अनेक वेळा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील चर्चा टोकाची होती. पण ही चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हितासंबंधी विचार करत असत, ही महाराष्ट्राची परंपरा होती.

“मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आमचे इतके जाहीर मतभेद असायचे की एकमेकांबद्दल शब्द वापरताना आम्ही कधी काटकसर केली नाही. पण ही बैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेक वेळा औरंगाबादला (Aurangabad) सभेत आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. पण ती सभा संपल्यानंतर त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आमची संध्याकाळ जायची. सभेत काय बोललो याचं स्मरणही कधी व्हायचं नाही.

पण, दुर्दैवाने महाराष्ट्रात (Maharashtra) अलिकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळतात. मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका (criticism) करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री ही संस्था आहे, या संस्थेचा मान ठेवला पाहिजे असा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लगावला.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या दिल्ली दौऱ्यावरुनही शरद पवार (Sharad Pawar) यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, अस्वस्थ असलेल्या लोकांनी कुठले कुठले मार्ग उपलब्ध आहेत, त्याच्या खोलात जाणार. त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवटीची दमदाटी केली जाते, त्याचे परिणाम होत नाही. निवडणुकीची वेळ आली तर त्याचे काय परिणाम होतात हे कोल्हापूरने सांगितलं आहे, त्यामुळे कोणी त्या टोकाला जाईल असं वाटत नाही”. असा चिमटाही त्यांनी काढला.

भाजपाकडून राष्ट्रपती राजवट (Presidential Reign) लागण्याची मागणी होत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता पवार म्हणाले की, “सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझं सरकार बर्खास्त केलं. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान आवरलं. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला”.

Related Stories

No stories found.