Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या...तेव्हा शरद पवारांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं; पंतप्रधान मोदींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

…तेव्हा शरद पवारांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं; पंतप्रधान मोदींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका होत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार हेच दाऊदचा (dawood ibrahim) माणूस आहेत, असा संशय येतोय असं निलेश राणे यांनी म्हटलंय. त्यानंतर बराच वाद सुरू आहे.

याचसंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतांना दिसत आहे की, ‘शरद पवार यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं. बाहेर काढलं. हे त्यांचं सामर्थ्य होतं.’

- Advertisment -

ताज्या बातम्या