लखीमपूर खेरी हिंसाचारावर शरद पवारांनी व्यक्त केला संताप, म्हणाले….

लखीमपूर खेरी हिंसाचारावर शरद पवारांनी व्यक्त केला संताप, म्हणाले….

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशातल्या (UP) लखीमपूरमध्ये (Lakhimpur Kheri violence) रविवारी शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, या घटनेत आणि यानंतर झालेल्या हिंसाचारात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात एका स्थानिक पत्रकाराचाही समावेश आहे.

ठार झालेल्यांमध्ये ४ शेतकरी (farmer), २ भाजप (bjp) कार्यकर्ते, १ अजय मिश्राचा चालक आणि एक स्थानिक पत्रकाराचा समावेश आहे. दरम्यान या घटनेवर राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या भावना अत्यंत कडक शब्दात मांडल्या. लखीमपूर घटनेच्या चौकशीच्या संदर्भातही त्यांनी काही मागणी केली आहे.

शरद पवार म्हणाले की, 'लखीमपूरची ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, लोक या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील.' अशी पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

तसेच, 'ज्याप्रकारे शांतीपूर्वक आपला हक्क बजावणाऱ्या शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्यातून भारत सरकारची नितीमत्ता स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र तुम्ही सत्तेचा वापर शेतकऱ्यांची दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र तुम्ही यशस्वी होणार नाही. याचं उत्तर फक्त पंजाबमधील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी उत्तर देतील.' असेही पवार म्हणाले आहेत.

त्याचबरोबर तिथे संवेदना व्यक्त करायला जाऊ पाहणाऱ्या विरोधकांना रोखले जात आहे. हातातील सत्तेचा गैरवापर करण्याचा हा प्रकार आहे. ज्याचा मी निषेध करतो. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, की तुमच्यावर हा अन्याय होत असला तरीही विरोधक म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्यासाठी तुमच्या मागण्यांसाठी लढू.' असेही पवार म्हणाले.

लखीमपूर खेरीमध्ये नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य (Uttar Pradesh Deputy Chief Minister Keshav Maurya) हे लखीमपूर खेरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करणात येत आहे.

Related Stories

No stories found.