
सांगोला | Sangola
राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष, अशी जहरी टीका शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji bapu) यांनी कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर केली आहे. सांगोल्याचे राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.
शहाजी बापू पाटील म्हणाले, सध्या अडचण अशी आहे की, आपल्या मानदेशी भाषेत एक म्हण आहे, ज्याला खालचं वरचं कळत नाही, त्याला कारभारी केलं. नाना पटोलेला कोळज कुठे, करगडी कुठे, नारळा कुठे, अकलूज कुठे काही माहिती आहे का? उग आपलं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्यायला कुणी माणूस नाही म्हणून याला केलं. हे काही नाही. राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असलेले सध्या दुर्दैवाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत.
मी 30-40 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबरच काम केलेलं आहे. भावनिक नातं असणं नैसर्गिक असणारच. माझा रस्ता भगव्या झेंड्याबरोबर आहे, त्याचा रस्ता तिरंगी झेंड्याबरोबर आहे. बाबूराव गायकवाड यांच्या अमृत सोहळ्याला शरद पवार इथे आले. हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. चांगला पार पडला. पवारसाहेबांना भेटल्यानंतर मला निश्चितच आनंद झाला, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.
राज्यात राजकीय स्फोट होणार या संजय राऊत (sanjay raut) यांच्या वक्तव्यावर शाहजी बापू म्हणाले असं संजय राऊत गेले चार महिने झाले बाेलत आहे, रोज सकाळी. बाेलू बाेलून त्यांचे मानगुट किती झालं बघा. आता ती एकदा भेलाकंडून पडतंय खाली असं वाटतय अशी टिप्पणी बापूंनी केली.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापाेटी ही मंडळी (मविआ) एकत्र येऊन काम करीत आहे. द्वेष मनात ठेवून केले जाणारे काम टिकत नसते. तिकीट वाटपात त्यांच्या (मविआ) चिंधड्या हाेतील असा दावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले.