Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयशहादा तालुक्यात सर्वाधिक 649 नामांकन

शहादा तालुक्यात सर्वाधिक 649 नामांकन

शहादा – Shahada – ता.प्र :

तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सातव्या दिवशी सर्वाधिक 180 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर आतापर्यंत एकुण 649 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दोन दिवसात तहसील परिसरात कार्यकर्त्यांच्या राबता वाढला आहे.

प्रथम ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतरच तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकार्‍यांना अर्जाची प्रत कागदपत्रांसह दाखल करावी लागत असल्याने नामांकन अर्ज दाखल करण्यास इच्छुकांना उशीर लागत आहे.

गाव निहाय उमेदवारी अर्ज असे-कुकावल (27), कोठली त.सा.(25), कुर्‍हावद त.सा.(1), कौठळ त.सा.(5), तोरखेडा (11), नांदरखेडा(20), शेल्टी (3), बामखेडा त.सा.(7), फेस(1), पुसनद (5), मनरद (7), सारंगखेडा (36), डामरखेडा (4), मोहीदे त.श.(12), राणीपुर(14), नागझरी (2) असे एकूण 180नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या