
मुंबई | Mumbai
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जळजळीत शब्दात टीका केली आहे. यासोबत लवकरच ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे, त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली. भाजपा आमदार राम कदम यांच्याकडून भाविकांसाठी मोफत काशी यात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यात्रेच्या ट्रेनला नारायण राणे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे म्हणाले, 'मी एक ना एक दिवस उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मी जेव्हा खासदार झालो तेव्हा संसदेमध्ये असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. तेव्हा ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेबद्दल जे काही बोलले आहे ते मी उद्धव ठाकरे यांना भेटून सांगणार आहे. ते ऐकल्यावर उद्धव ठाकरे संजय राऊत यांना चपलेने मारतील.' तसेच, 'संजय राऊत मातोश्रीला संपवणार आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे, असं देखील नारायण राणे यावेळी म्हणाले आहे.
तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना एकटं फिरण्याचे आव्हान केलं होत. त्यावर नारायण राणेंनी संजय राऊतांच आव्हान स्वीकारलं आहे. तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते; असं खुलं आव्हानच नारायण राणे यांनी राऊतांना दिलं आहे.
पुढे ते म्हणाले, मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही. १९९० सालापासून मला संरक्षण आहे. मी ज्यांच्याविरोधात लढलो. त्यात बाहेरचे लोक होते. त्यांच्या विरोधात लढलो म्हणू मला ९० सालापासून मला संरक्षण दिलं आहे. मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिलं आहे, असं देखील राणे म्हणाले. पण एक दिसू मी सरंक्षण सोडून राऊत समोर येईल असं देखील राणे म्हणाले आहेत. यामुळे आता नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.