Monday, April 29, 2024
Homeराजकीयराजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नाही - योगेंद्र यादव

राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नाही – योगेंद्र यादव

पुणे |प्रतिनिधी| Pune

राजकारण (Political) हे केवळ सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नसून सामाजिक सक्रियता, विधायक क्षेत्र कार्य, शैक्षणिक (Academic), राजकीय (Political) आणि अध्यात्म या गोष्टी एकत्रितरित्या करणे म्हणजे राजकारण (Political) आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव (Senior political analyst Yogendra Yadav) यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) राज्यशास्त्र विभागाने (Department of Political Science) आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात (online lectures) ते बोलत होते. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मंगेश कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक श्रीरंजन आवटे व राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

यादव (Senior political analyst Yogendra Yadav) म्हणाले, प्राचीन काळात राजकारणाचा अर्थ फार मर्यादित होता. त्या त्या वेळच्या राजांनी आपला साम्राज्य वाढविण्याच्या दृष्टिकोन ठेऊन केलेली नीती म्हणजे राजकारण होते, त्यात सामान्य जनतेचा सहभाग किंवा हित विचारात घेतलं जात नसे. मात्र आताच्या काळातील राजकारण हे व्यापक स्वरूपाचे असून यातील प्रत्येक घटक या राजकारणाचा भाग झालेला आहे. त्यामुळेच राजकारण हा मुद्दा केवळ निवडणुकीपूरता (election) मर्यादित राहिला नाही तर तो व्यापक झाला आहे.

व्याख्यानानंतर विद्यार्थी आणि प्राध्यापकांची प्रश्नोत्तरांची फेरीही घेण्यात आली. विभागातील संशोधन विद्यार्थी अक्षय चौधरी यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या