Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

दिल्ली | Delhi

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करत पटेल यांच्या निधनाची बातमी दिली.

- Advertisement -

फैजल पटेल यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली,” असं फैजल पटेल यांनी म्हटलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.” असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विट करून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभाग घेतला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या