Friday, April 26, 2024
Homeराजकीयतीन-चार दिवसांत मोठी बातमी : खडसे

तीन-चार दिवसांत मोठी बातमी : खडसे

जळगाव –

आपल्या पक्षांतरासंदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसांत आपण मोठी बातमी देऊ

- Advertisement -

असे भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे म्हटले आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.

भाजपमध्ये सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसर्‍या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुसर्‍याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून सहभागी झाले होते.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय संघटक प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री सतीश गंगवार, विजय पुरानिक, सुधीर मनगुंटीवार आदी नेते सहभागी झाले होते. या बैठकीत पक्ष संघटन, विविध राजकीय घडामोडी व इतर विषयांवर चर्चा झाली.

तो विषय जुना

या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याविषयी माहिती देणे खडसे यांनी टाळले. तसेच कार्यकर्ता व खडसे यांच्यातील संवादाच्या व्हायरल झालेल्या क्लिप बद्दल विचारले असता तो विषय आता जुना झाला असून तीन-चार दिवसात मोठी बातमी देतो, असे सांगून बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे संकेत खडसे यांनी दिले. या बैठकीमध्ये ऑडिओ क्लिप विषयी देखील विचारणा झाल्याची माहिती असून त्याविषयी मात्र खडसे यांनी बोलणे टाळले. तसेच क्लीप मधील संवादानंतर राष्ट्रीय स्तरावरील नेते खडसे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सहभागी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये

या बैठकीमध्ये कोण कोण सहभागी झाले याविषयी माहिती देताना खडसे यांनी वरील नेत्यांचे नाव सांगितले व शेवटी फडणवीस हे बिहारमध्ये आहे, असे सांगायला देखील ते विसरले नाही.

आठवडाभराच्या घडामोडींचा आढावा

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली व त्यानंतर गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मते जाणून घेतली होती. त्यापाठोपाठ लगेच महिनाभरात निर्णय घेणार असल्याचा संवाद असलेली क्लीप व्हायरल झाली. या सर्व घडामोडीं नंतर भाजपाने ऑनलाईन बैठक बोलावून खडसे यांना त्यात सहभागी होण्याचे कळविले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या