Sunday, May 5, 2024
Homeराजकीयअर्थसंकल्पीय अधिवेशन : विरोधकांची चर्चा पाहून 'नटसम्राट' पाहिल्याचा भास

अर्थसंकल्पीय अधिवेशन : विरोधकांची चर्चा पाहून ‘नटसम्राट’ पाहिल्याचा भास

मुंबई l Mumbai

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरु झालं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.

- Advertisement -

दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र, यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. सुधीर मुनगंटीवार जेव्हा भाषण करतात, तेव्हा मी नटसम्राट बघतोय की काय असा भास होतो. कुणी किंमत देता का किंमत, असा त्यांचा अभिनिवेश असतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला. तसेच, माझं जसं झालंय, तसंच तुमचंही झालंय. कलागुणांना वाव नाही हो या क्षेत्रात. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली. आता बंद आहे. पण कलाकार कुठे थांबून नाही राहात. जिथे संधी मिळेल, तिथे कला उचंबळून येते. पण सुधीरभाऊ, ती मारू नका, असंही उद्धव ठाकरे सुधीर मुनगंटीवारांना म्हणाले.

करोना म्हणतोय मी पुन्हा येईन; मी पुन्हा येईन…

दरम्यान मुख्यमंत्र्यानी फेसबुक लाईव्हवरुन फडणवीसांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘मी करोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हमधून मी महाराष्ट्राच्या जनतेच्या घरात पोहोचलो, नागरिकांना धीर मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच करोना काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. हा व्हायरस आहे, तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहातच टोला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या