Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागृहमंत्री देशमुख-एकनाथ खडसे यांच्यात गुप्तगू

गृहमंत्री देशमुख-एकनाथ खडसे यांच्यात गुप्तगू

रावेर – प्रनिधी Raver

राज्याचे लक्ष वेधणाऱ्या बोरखेडा घटनेने सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.या घटनेचे गांभीर्य पाहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज घटनेच्या आढावा घेण्यासाठी रावेरात दाखल झाले होते. त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी…

- Advertisement -

रस्त्यावर गाडीत बसूनच काही वेळ चर्चा केल्याने,त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. माजी मंत्री गेल्या अनेक दिवसापासून स्वकीयांवर नाराज झाल्याने,पक्ष सोडणार असल्याची अनेकदा चर्चा होत आहे. घटस्थापनेला ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा असतांना, आज रावेर येथील बोरखेडा येथे चार भावंडाचा निघुर्ण खून झाल्याने या घटनेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज रावेर आले होते.

यावेळी रावेर येथे पिडीत कुटुंबियांची भेट घेवून ते परतत असतांना रावेर शहराच्या बाहेर बिजासनी माता मंदिराजवळ गाडी थांबवून त्यात फक्त एकनाथ खडसे व मंत्री देशमुख यांच्या चर्चा झाली. या भेटीने राजकीय वर्तुळाला आता मोठी चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या