Friday, April 26, 2024
Homeराजकीयसमीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?, नवाब मलिकांनी शाळेचा दाखलाच केला सादर

समीर वानखेडे हे हिंदू की मुस्लिम?, नवाब मलिकांनी शाळेचा दाखलाच केला सादर

मुंबई l Mumbai

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) पत्रकार परिषदांचं सत्र सुरुच ठेवलंय. आजही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंविषयीचा आणखी एक दाखला आणि मोठा गौप्सस्फोट मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यातून समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याकडं लक्ष वेधलं असून ही कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान नवाब मालिकांनी हा दाखला दाखवला केला असला तरी काही वेळातच वानखेडे हे मुस्लिम की हिंदू आहेत हे न्यायालयाकडून स्पष्ट होणार आहे.

अमरावती हिंसाचार : ऑडिओ क्लिप शेअर करत नवाब मलिकांचा भाजपावर निशाणा

समीर वानखेडे यांचे शाळा सोडल्याचे दोन दाखले समोर आले आहे. सेंट पॉल आणि सेंट जोसेफ या दोन शाळांचे दाखले समोर आले आहेत. शाळांच्या दाखल्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. काल अभिनेत्री आणि पत्नी क्रांती रेडकरने हिने समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट केला होता. त्या दाखल्यावर समीर यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे, असे लिहले होते. हेच दाखले नवाब मलिक न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती दिली.

समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची सिद्धता होण्यासाठी आणि वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेविरोधात आणखी काही कागदपत्रे विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Hight Court) सादर करण्यात आली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या