मसाज, VIP ट्रीटमेंटनंतर मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर

मसाज, VIP ट्रीटमेंटनंतर मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर

दिल्ली | Delhi

दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) सध्या तिहार कारागृहात आहेत. त्याचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Satyendra Jain latest news)

दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहार कारागृहात आहेत. त्याचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Satyendra Jain latest news)

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जैन यांना जेवण घेऊन येत असताना दिसत आहे, हा व्हिडिओ १३ सप्टेंबरचा आहे. भाजपने बुधवारी या व्हिडिओ व्हायरल केला आहे. यापूर्वी सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. या व्हिडिओमध्ये ते मसाज करताना दिसत आहे.

सत्येंद्र जैन ज्या व्यक्तीकडून मसाज घेत आहेत त्याचे नाव रिंकू असून त्याच्यावर बलात्काराचाही आरोप असल्याचा दावा करण्यात आला होता. रिंकूवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षानेही या प्रकरणावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला होता. आता तुरुंगात पौष्टिक आहार घेत असलेल्या सत्येंद जैनचा हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com