Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंनी कॉंग्रेसमध्ये परतीचे दोर कापले? 'त्या' ट्विटने चर्चांना उधाण

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंनी कॉंग्रेसमध्ये परतीचे दोर कापले? 'त्या' ट्विटने चर्चांना उधाण

अहमदनगर | Ahmednagar

नाशिक पदवीधर विधानपरिषदेच्या  (Nashik Graduate Constituency Election) जागेवरून कॉंग्रेसमधील (Congress) कलह चव्हाट्यावर आला. अपक्ष म्हणून सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) निवडणूक लढून जिंकून आल्यानंतर त्यांचे मामा आणि माजी कॉंग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही राजीनामा दिला. पण या राजीनामानाट्यानंतर दिल्लीत पुन्हा हालचालींंना वेग आला आहे.

काल बाळासाहेब थोरातांनी भर सभेत बोलताना सत्यजितच पक्ष विरूद्ध अपक्ष किती चालतंय हे बघू. तुझ्याशिवाय कॉंग्रेसला आणि कॉंग्रेस मधील तुझ्या टीमला कसं करमणार असं म्हणत त्यांच्या पुनरागमनाचे संकेत दिले. पण आज सत्यजित तांबे यांनी चारोळी ट्वीट केली आहे. सत्यजित तांबे यांचं हे ट्वीट आता चर्चेत आले आहे. (Satyajeet Tambe new Tweet)

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंनी कॉंग्रेसमध्ये परतीचे दोर कापले? 'त्या' ट्विटने चर्चांना उधाण
शिवसेना कोणाची? आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी... एकाच क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट....

सत्यजीत तांबे यांनी एक चारोळी ट्विट केली आहे. 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी..... घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी', अशा सूचक असणाऱ्या ओळी सत्यजीत तांबे यांच्या ट्विटमध्ये आहेत. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे सर्व दोर कापून टाकले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंनी कॉंग्रेसमध्ये परतीचे दोर कापले? 'त्या' ट्विटने चर्चांना उधाण
Nabam Rebia Case : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयात 'नबाम रेबिया'चा दाखला, नेमकं काय प्रकरण?

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रा आली असताना सत्यजीतने त्यात खूप काम केले. सत्यजीतची टीम राहिली काँग्रेसमध्ये आणि तू एकटा राहिला. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. माझा हात नीट असता तर तांत्रिक चूकही झाली नसती. मी स्वतः नाशिकमध्ये राहिलो असतो, ती चूक होऊ दिली नसती. परंतू या सगळ्यामधून माझ्या मताची दिल्लीने दखल घेतली आहे. काहीही झाले तरी पक्षांतर्गत गोष्टी आम्ही पक्षातच सोडवू., असं वक्तव्य थोरात यांनी संगमनेर येथील जाहीर सभेत केलं.

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंनी कॉंग्रेसमध्ये परतीचे दोर कापले? 'त्या' ट्विटने चर्चांना उधाण
Valentine Day : ...आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

दरम्यान सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त केल्यानंतर ते पुढे काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी आपण अन्य कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष राहूनच काम करणार असल्याचं जाहीर केले आहे. पण तांबे-थोरात यांच्या कॉंग्रेस मधील नाराजीनाट्यानंतर भाजपा त्यांना गळाला लावणार का? अशी देखील चर्चा आहे. भाजपाकडूनही आपल्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे असल्याचं म्हटलं होते. त्यामुळे आता सत्यजित पुढे राजकीय भूमिका काय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com