सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का

सातारा | Satara

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आले आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला सून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे.

शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना २४ मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना २५ मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांचा पराभव केला. मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजितसिंह पाटणकर यांचा १४ मतांनी विजय झालाय. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ४४ मते मिळाली तर सत्यजितसिंह पाटणकर यांना ५८ मते मिळाली आहेत. शंभूराज देसाई यांचा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी ११ उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com