
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करा, असे निर्देश दिले आहेत. यानंतर आता राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे....
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर दिल्लीला नेमक्या कुठल्या कारणासाठी गेले आहेत, यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, आमचे दिल्लीतील वकील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा करणे महत्त्वाचे असून सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) नेमका आदेश काय आहे? हेही समजून घ्यायला पाहिजे. यासाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. त्यात विशेष काही नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने काही कालमर्यादा दिली नाही. पण न्यायालयाने सांगितले आहे की, ही कारवाई थोडी जलद गतीने करा. यासाठी प्रक्रिया डावलून कारवाई करा, असे म्हटले नाही. त्यामुळे प्रक्रियेप्रमाणे ही कारवाई करायची आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसाठी जेवढा वेळ लागणार आहे, त्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होईल, असेही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत? या दोन्ही न्यायीक संस्था आहेत. यामध्ये कुठे ना कुठे एकमेकांच्या अधिकारांवर गदा येतेय का? हाही प्रश्न उपस्थित होतोय. म्हणून कदाचित या चर्चेसाठी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) दिल्लीला (Delhi) गेले आहेत, असेही भाष्य संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे.