शिवसेनाप्रमुख हे शिवसैनिकांचे दैवत, तुमची प्रॉपर्टी नव्हे; संजय शिरसाट कडाडले

संजय शिरसाट
संजय शिरसाट

मुंबई | Mumbai

राज्यात काही दिवसांपूर्वी मोठे बंड पाहायला मिळाले. शिंदे गटाने (Shinde Group) बंडखोरी करून भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले आहे. यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच मुलाखत देत आपली बाजू मांडली आहे. यानंतर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे...

ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आमच्यासाठी खूप मोठे आहेत. त्यांच्या पुणाईमुळेच आम्ही आमदार, खासदार झालो. तुम्हाला राजकारण करायचे आहे तर बाळासाहेबांचा वापर कशाला करता आहात.

एका दर्जेवर गेलेल्या मोठ्या नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकाचे (Shivsainik) दैवत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, असे शिरसाट म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणताय मी आजारी असताना बंडाची हालचाल सुरू होती, हे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना कुठल्याही बैठका झाल्या नाही. उद्धव ठाकरे आजारी होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी यज्ञ केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोडा घातला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांची एकी कधी पाहिले नाही. संजय राऊत सारखा माणूस गेला आणि त्याने जुळवाजुळव केली, त्यामुळे आज ही अवस्था झाली आहे. म्हणूनच आम्ही सगळे बाहेर पडलो. उद्धव ठाकरेंना कसा राग येईल आणि शरद पवार कसे जवळ येतील, हे घडवून आणण्यात आले, अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली.

आम्ही कोणत्या पक्षात जाणार आहोत, याबद्दल चिंता करू नका, आम्ही आमचे काय ते पाहू. दरवेळेस कुणाचे बहुमत घेऊन आपण सत्तेत आलो आहोत. हे त्यांना माहित आहे. त्यामुळे आम्ही सपा, एमआयएममध्ये जाणार याचा विचार करू नका, आम्हाला कुठे जायचे तिथे आम्ही जाऊ, असे उत्तर शिरसाट यांनी दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com