Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या‘खैरे म्हणाले होते, आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना खासदार केलं’; संजय शिरसाट...

‘खैरे म्हणाले होते, आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना खासदार केलं’; संजय शिरसाट यांचं धक्कादायक विधान

मुंबई । Mumbai

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. याला आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना खासदार केलं, असा धक्कादायक दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

- Advertisement -

संजय शिरसाट म्हणाले की, ठाण्यातील मेळाव्यात राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना क्षमा नाही, असं म्हटलं प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तिथून शिवसेनेत आल्यावर चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की, प्रियंका चतुर्वेदींची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली. त्या प्रियंका चतुर्वेदी आता दुसऱ्यांना गद्दार म्हणतात. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये आनंद दिघे यांचे नाव घेतले. दिघे साहेबांनी जी शिवसेना उभी केली त्यात एकनाथ शिंदे, राजन विचारे यांना तिकीट देण्यापासून ते निवडणुकीला उभे करण्यापर्यंत आनंद दिघे यांचा हात होता. उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांबद्दल कधीही कळवळा नव्हता. सामान्यांबद्दल कधीही ते चांगलं बोलले नाहीत. उलट आनंद दिघे यांना डॅमेज कसं करता येईल असे प्रकार उद्धव ठाकरे यांनी केले, असा दावा शिरसाट यांनी केला.

मी दिघे साहेबांना शंभर वेळेस भेटलो असेल. दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला कोण का नाही आलं? व्हिडीओ आहे ना त्यांच्याकडे? बघावा त्यांनी. दिघे साहेबांसारखा माणूस नव्हता. परंतु दिघे साहेबांना संपवण्यासाठी काय काय कटकारस्थाने केली आणि कसे त्यांचे साथीदार मारल्या गेले हे सर्वांना माहीत आहे. भांडुपचा थापा का मारला गेला? असे प्रश्न उपस्थित होतात, असंही शिरसाट म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या