जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका या महाविकास आघाडीच्या सहकार्याने लढविण्यात येणार असून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे कार्य थेट जनतेपर्यंत पोहचवा,

एक मंत्री, तीन आमदारांसह कार्यकर्त्यांचे पाठबळाच्या जोरावर जास्तीत जास्त जागा या शिवसेनेच्या निवडून आणून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या असे प्रतिपादन संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.

सरदार लेवा भवन येेथे शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. किशोरअप्पा पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील

जेथे सेनेचे प्राबल्य कमी तेथे महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांना पुढे करु व जेेथे सेनेचे प्राबल्य आहे तेथे सेनाच पुढे राहील, याप्रमाणे आघाडीच्या सहकार्याने जास्तीत जागा व ग्रामपंचायती बिनविरोध विजयी करु असा निर्धार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आगामी काळात खासदारही शिवसेनेचाच असेल व जिल्हा परिषदेवरही शिवसेनेचा भगवा फडकेल असा आशावादही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

आ.किशोर पाटील

यावेळी महाविकास आघाडीच्या सहकार्याने निवडणुका आपण लढविणार आहोत त्यामुळे येणार्या अडचणींवर मात करुन जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. तसेच थोडे एक पाउल मागे सरकत जेथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे वर्चस्व आहे तेथे त्यांना संधी दिली जाईल असा निर्धार पाचोर्याचे आ. किशोरअप्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

आ.चिमणराव पाटील

ग्रामपंचायत निवडणुका या स्थानिक स्वराज्य सस्थेतील मूळ गाभा आहे. या निवडणुकांद्वारे शिवसेेनेची खरी शक्ती काय आहे ती दाखवण्याची वेळ आता येवून ठेपली असून निवडणुकीद्वारे आपली शक्ती वाढवावी असा निर्धार एरंडोलचे आ. चिमणराव पाटील यांनी मेळाव्यात स्पष्ट केले.