मध्यावधी निवडणुकीवर संजय राऊतांचे सूचक विधान; “प्रत्येक फुटीर गटात एक...”

मध्यावधी निवडणुकीवर संजय राऊतांचे सूचक विधान; “प्रत्येक फुटीर गटात एक...”

मुंबई | Mumbai

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांना बळकटी देणारं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले की, कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचचं नाहीये. पण राज्यात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. जे नेते म्हणतात हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायमच असतो हे लक्षात घ्या, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.

दरम्यान संजय राऊत यांनी थेट शिंदे गट फुटणार असल्याची भविष्यवाणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com