Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याऔरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे महाराष्ट्राचे आदर्श नाही; एमआयएमची ऑफर सेनेने धुडकावली

औरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे महाराष्ट्राचे आदर्श नाही; एमआयएमची ऑफर सेनेने धुडकावली

मुंबई | Mumbai

एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) येणार तयारी दर्शवली यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेना (Shivsena) काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागली होते…

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने एमआयएमची (MIM) ऑफर धुडकावून लावली आहे. तसेच राऊतांनी भाजपला टोलाही लगावला आहे.

होळीला गालबोट! तुंबळ हाणामारीत चार ठार, सहा जखमी

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे तीनही पक्ष महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या विचारांना मानणारे पक्ष आहेत. मात्र एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबच्या कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. ते शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही.

Visual Story : मोस्ट अवेटेड ‘KGF Chapter 2’ चे गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

जे भाजपसोबत (BJP) छुप्या युतीत काम करत आहेत. त्यांचा महाविकास आघाडीत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एमआयएम ही भाजपची टीम बी आहे हे आपण सर्व राज्यांमध्ये पाहिले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या