Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या"हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, विरोधकांना..."; संजय राऊतांचा गंभीर आरोप

“हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, विरोधकांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

लॅारेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गॅंगकडून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते…

- Advertisement -

संजय राऊत यांना आलेल्या या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, ‘हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॅारेन्स के और से मॅसेज है… सलमान और तू फिक्स… तयारी करके रखना…’ असे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे. तसेच या मेसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.

यानंतर संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. हे विरोधकांना तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत यांची मजल जाऊ शकते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार आपण पाहत आहे. परवा पोलीस खात्यातील वैभव कदम यांनी आत्महत्या केली असे अनेक प्रकार रोज घडत आहेत.

पण राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री याला गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही अशाप्रकारे आलेल्या धमक्यांची माहिती त्यांना देतो, तेव्हा थेट गृहमंत्री चेष्टा करतात. हे स्टंट आहे असे म्हणतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सुप्रिय सुळेंची झेड प्लस सुरक्षेची मागणी

संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी राऊत यांना झेट प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या