Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या…म्हणून बोम्मईंनी सीमावाद काढला; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

…म्हणून बोम्मईंनी सीमावाद काढला; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सीमाप्रश्नावरून केलेल्या विधानावर आता वाद सुरू झाला आहे. यावरून संजय राऊतांनी आज भाजपवर गंभीर आरोप केले आहेत…

- Advertisement -

राऊत म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हे फार मोठे कारस्थान आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या नेत्यांकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावे, म्हणून बोम्मईंना पुढे करून महाराष्ट्रातील काही गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावे आणि शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा.

जर असे नसते तर भाजपचा एक मुख्यमंत्री भाजपच्या दुसऱ्या राज्यावर असा हल्ला करताना देशात कुठेच दिसत नाही. कधी पाहिले आहे का तुम्ही की योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हल्ला केला? तो एक शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांवर बोलणे ही ठरलेली स्क्रिप्ट आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

तारक मेहता फेम ‘बबिता’चा अपघात

शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जो विषय चाललाय, त्यावरचा लोकांचा संताप कमी करावा आणि या विषयाकडे लक्ष वळवावे. यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले हे स्क्रीप्ट आहे.

‘डॅडी’बाबत न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सरकार सोडून द्या, महाराष्ट्राची एक इंच काय, एक वितही भूमी शिवसेना देणार नाही. महाभारत याच गोष्टीमुळे घडले आहे. हे महाराष्ट्राचे नवे महाभारत घडू शकते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खोके सरकारवर महाराष्ट्राचा विश्वास नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या