Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही,समोरुन वार करतो

आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही,समोरुन वार करतो

पुणे(प्रतिनिधि)

आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही, समोरुन वार करतो अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विधांन सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.

- Advertisement -

अजित पवार यांच्या सोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीवर एका वेबिनारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत झालेल्या शपथ विधीमळे माझ्या प्रतिमेला तडा गेला मात्र, त्यावळी आमच्या मनात राग होता. त्यातून आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु, आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. असेही फडणवीस म्हणाले होते. पण राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला होता. याबाबत राऊत यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.

राऊत म्हणाले, अजित पवार संध्याकाळपर्यंत परत येतील हे आम्ही त्यावेळीही सांगितले होते. आणि आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही, समोरुन वार करतो.

राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील हे वसंतदादा पाटील नाहीत. पण कोणी किती वैयक्तिक बोलावं याचा विचार करायला हवा. शरद पवारांवर आरोप केल्याची सध्या फॅशन झाली आहे. त्याशिवाय बातम्या होत नाहीत.

आगामी निवडणुकांमध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर असणार हे नक्की

आगामी काळात होणारी निवडणुकांमध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी एक काही तरी नक्की असणार आहोत असा आत्मविश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात अनलॉक होतोय ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पायरीवर निर्बंध कमी कसे करायचे याची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडतोय ही चांगली गोष्ट आहे. महाविकास आघडी सरकार मध्ये सगळं काही व्यवस्थित सुरु आहे पण कोना कोणात थोडा उत्साह असतो अशा शब्दात राऊत यांनी विजय वड्डेटीवार यांच्या निर्बंध शिथिल करण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयावर मिश्कील टिपण्णी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या