Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानारायण राणे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?; संजय राऊत म्हणतात, मजा येईल...

नारायण राणे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?; संजय राऊत म्हणतात, मजा येईल…

मुंबई | Mumbai

राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि राज्य सरकारमध्ये कलगीतुरा सुरुच होता. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आले…

- Advertisement -

मात्रा राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील तू-तू, मै-मै सुरूच आहे. राज्यपालांनी काही ऐतिहासिक व्यक्तींविषयी केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना पदावरून दूर केले जाणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांच्याजागी कोण येणार? यावर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.

नाशिकहून चाळीसगावला जाणाऱ्या बसला अपघात; अनेक प्रवाशी जखमी

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: केंद्र सरकारला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने मुंबई-शिर्डी प्रवास करताय? ‘असे’ आहेत तिकीट दर

नारायण राणे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले तर काय होईल, अशी विचारणा आज ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी राऊत म्हणाले की, नियम आणि कायदा पाहिला, तर त्या राज्याचा नागरिक हा त्या राज्याचा राज्यपाल होऊच शकत नाही. पण या देशात अनेक घटनाबाह्य गोष्टी होत असतात. असे काही घटनाबाह्य कृत्य होत असेल, तर आम्ही त्या नावाचे स्वागत करू, मजा येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या