उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्ष; रामदास कदमांची घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्ष; रामदास कदमांची घणाघाती टीका

मुंबई | Mumbai

संजय राऊत (sanjay raut) यांनी शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच मुलाखत घेतली आहे. त्याचे दोन भाग काल आणि आज प्रदर्शित करण्यात आले आहे. या मुलाखतीवर शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी घणाघाती टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंची कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं देणार. हे सगळं हास्यास्पद आहे. बरं त्यात नवीन काय होतं. ती गंजलेली तलवार, आईचं दूध, शिवसेना आई होती, बाळासाहेबांची शिवसेना आई होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत गद्दारी कुणी केली, हे तुम्ही सांगा ना.'

तसेच, 'आईच्या दुधाची आठवण तुम्ही ठेवताय, तर मग शिवसेनेची आई बाळासाहेबांचे विचार होते. मग बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही केली. हे बाकीच्यांना ठीक आहे, नवीन शिवसैनिक, तरुण पिढी या भावनिक ब्लॅकमेलमध्ये थोडे अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतलाय, असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

'उद्धव ठाकरेंवर आता हातपाय जोडण्याची वेळ आली आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली आहे. नवीन शिवसैनिक आणि नवी पिढी असल्याने तुमच्या भावनेच्या जाळ्यात अडकेल परंतु, जुन्या बऱ्याच शिवसैनिकांचे खून झालेत. अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत. अनेकजण देशोधडीला लागले हे विसरून चालणार नाही. या सगळ्यांच्या बलिदानानंतर आणि लढाईनंतर शिवसेना उभी झाली आहे. संजय राऊत शिवसेना एकत्र ठेऊ शकतील का?,' असा सवालही त्यांनी सेनेला केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com