Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याईडीने समन्स बजावताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, माझी मान कापली तरी...

ईडीने समन्स बजावताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, माझी मान कापली तरी…

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने समन्स (ED) बजावले आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने (ED) दिले आहेत….

- Advertisement -

जमीन घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे ईडीने समन्स बजावले आहे. यावर आता संजय राऊत यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत.

मला रोखण्यासाठी.. हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना दणका; मंत्रीपदं काढली, ‘असे’ आहे खात्यांचे फेरवाटप

संजय राऊत यांना उद्या म्हणजेच सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने याआधीही संजय राऊत यांचा अलिबागमधील प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता. ईडीने राऊत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या