संजय राऊत उद्या ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण...

संजय राऊत उद्या ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण...

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज ईडीने समन्स (ED Summons) बजावले आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने (ED) दिले आहेत. यावर संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे...

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, उद्या माझी अलिबाग येथे सभा आहे. तसेच इतर अनेक ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मी उद्या त्या सभेला जाणार आहे.

संजय राऊत उद्या ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण...
ईडीने समन्स बजावताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, माझी मान कापली तरी...

मी ईडीकडे (ED) वेळ मागणार आहे. उद्या ईडीच्या कार्यालयात गेलो नाही, तरी चौकशीसाठी मी नक्की हजर राहील. कारण मी पळ काढणारा नाही. कायदेशीर प्रक्रियाला सामोरे जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत उद्या ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण...
उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना दणका; मंत्रीपदं काढली, 'असे' आहे खात्यांचे फेरवाटप

ते पुढे म्हणाले की, तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी मी घाबरणार नाही. गुवाहाटीमध्ये जाण्यापेक्षा खोट्या आरोपात तुरुंगात गेलो तरी चालेल. तुम्ही माझा गळाही कापला तरी मी गुवाहाटीला जाणार नाही.

संजय राऊत उद्या ईडी कार्यालयात जाणार नाही, कारण...
शिवसेनेच्या अडचणीत वाढ! संजय राऊतांना ED कडून समन्स

मी बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) शिवसेनेत (Shivsena) राहणार आणि ती वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com