संजय राऊत आज दुपारी गाझिपूर मधील आंदोलकांची भेट घेणार

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई | Mumbai

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत मंगळवारी, दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर भेट घेण्यास जाणार असल्याचेही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, "महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत."

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी बिलावरुन याआधी शरद पवार यांनी सुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुंबईत 25 जानेवारीला झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com