राऊतांना १०१ टक्के अटक होणार; नवनीत राणांचा दावा

राऊतांना १०१ टक्के अटक होणार; नवनीत राणांचा दावा

मुंबई | Mumbai

आज सकाळी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) ईडीची टीम पोहोचली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे...

ईडीची टीम संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी पोहोचल्यावर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. संजय राऊत यांना १०१ टक्के अटक होणार असा दावा, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या की, एखाद्या पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून? गोरगरीबांचे पैसे उकळून संजय राऊत यांनी आपली संपत्ती बनवली आहे. भ्रष्टाचारी संजय राऊतांविरोधात महाराष्ट्रातील जनता एकत्र लढणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com