
मुंबई | Mumbai
शिवसेना (Shivsena) ही निष्ठावंताची सेना आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशीदेखील बोलणे झालेले आहे. राजकारणात अशा प्रसंगाना सामोरे जावे लागते. अनेक आमदारांशी आमचा संपर्क झालेला आहे, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
तसेच राज्यात राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भूकंपाची भाषा कोण करत असेल तर त्यांना शिवसेनेशी लढावे लागेल, राज्यात कुठलाही भूकंप होणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार नॉट रिचेबल आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? याची जोरदार चर्चा रंगली आहे. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नेहमी आढावा घेत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्ची सुरु आहे. काही लोक अफवा पसरवत आहेत. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेले आहे. त्यामुळे काहीही धोका नाही, असे राऊत म्हणाले.
तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर (Shivsena) घाव घालणे म्हणजे राज्याला दुबळे करणे होय, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिंदे यांच्यासह नॉटरिचेबल आहेत.