Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या“महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री...”; संजय राऊतांचा घणाघात

“महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री…”; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई | Mumbai

राज्यातील काही रुग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडव झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूप्रकरणामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच या प्रकरणाची जबाबदारी घेऊन आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही केली जात आहे. विरोधकांनी तर मुख्यमंत्र्यांनीच स्वत: आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हल्लाशिवाय राज्यात १०० हून अधिक लोकं मृत्यू पावलेत. हा अत्यंत गंभीर विषय राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या मनाला अस्वस्थ करत नसेल तर त्यांचे मन मेले आहे. दिल्लीवाल्यांच्या मन की बात ऐकायला ते येतात. परंतु नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर याठिकाणच्या लोकांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री स्वार झालेत अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

“चला झोपेतून तर उठले…”; आव्हाडांनी अण्णा हजारेंना पुन्हा डिवचलं

महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ आणि चिंतेत आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार फक्त सत्तेवर आहे परंतु कार्यक्षम नाही. त्याचा परिणाम राज्यातील जनता भोगतेय, गेल्या ८ दिवसांपासून राज्यात शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे त्याला जबाबदार राज्यातील बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार आहे. कारण त्यांचे राज्य कारभारात लक्ष नाही. राज्यात काय सुरू आहे? शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे हाल सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत सरकारला टेंडरबाजी, राजकारण, महामंडळ, पालकमंत्री यात मश्गुल आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रेबाबत कालमर्यादेत प्रकरण मिटवा असं सांगितले. परंतु विधानसभा अध्यक्ष बहुतेक परग्रहावरील घटनेला मानतात, या देशातील घटनेला मानत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या तारखा दिल्यात त्या पुन्हा कोर्टाच्या निदर्शनास आणू. अशाप्रकारे बेकायदेशीर सरकार चालवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबले जातील. सर्वोच्च न्यायालय संवेदनशील परंतु त्यांच्यावर कामाचा ताण आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर पुन्हा उभे राहू. निवडणूक आयोग, पक्ष, चिन्ह वेगवेगळे विषय आहेत ते सर्व मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेले असताना ‘एक फुल दोन हाफ’ कुठे आहेत?; रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे संतप्त

- Advertisment -

ताज्या बातम्या