Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या“सनी देओलचा बंगला २४ तासांत वाचवला, मग नितीन देसाई...”; संजय राऊतांचा गंभीर...

“सनी देओलचा बंगला २४ तासांत वाचवला, मग नितीन देसाई…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

२५ ऑगस्ट रोजी अभिनेते सनी देओल यांच्या बंगल्याची लिलावाची प्रक्रिया पार पडणार होती. ५६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी सनी देओल यांचा बंगला बँक ऑफ बरोडाने ब्लॉकवर ठेवला होता. पण अभिनेते भाजप खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस काही तासात मागे घेण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान याच विषयावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. त्यांनी दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत काय घडले, याची आठवण करुन देत देओल यांच्या बंगल्याच्या विषयावर टीका केली. सनी देओलचं घर वाचवण्यासाठी दिल्लीहून संदेश आला. पण कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कुठलीही मदत केली गेली नाही त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं असा आरोप राऊतांनी केला आहे.

राऊत म्हणाले की, अभिनेता सनी देओल यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदाकडून केला जाणार होता. ते जवळपास ६० कोटींचं कर्ज फेडू शकले नव्हते, त्यामुळे बँकेने लिलाव करण्याचा निर्णय घेतला. सनी देओल यांच्याशी कोणतेही वैयक्तिक भांडण नाही, ते एक चांगले अभिनेता आणि व्यक्ती आहेत. मात्र २४ तासात तुम्ही लिलाव थांबवला, दिल्लीतून संदेश आला. त्यांचे घर आणि त्यांनाही वाचवले. मात्र आमचे नितीन देसाई त्यांचा स्टुडिओ वाचवण्यासाठी दारोदार भटकत होते. त्यांनीही कर्ज चुकवायचे होते. त्या घटनेच्या दोन दिवस आधी ते दिल्लीला गेले होते, भाजप नेते आणि मंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. मात्र त्यांना कोणताही दिलासा दिला गेला नाही. नितीन देसाईंचा स्टुडिओही वाचवला नाही आणि त्यांचा जीवही वाचवला नाही. दिल्लीतून सूत्र हलवल्यानंतर २४ तासात सनी यांचा बंगला वाचवण्यात आला, मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही? असा सवाल यावेळी राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की, नितीन देसाई यांनी दिल्लीत जाऊन काही महत्त्वाच्या भाजप नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी कोणाचेही नाव यावेळी घेतले नाही. राऊत यांनी असेही सांगितले की यावेळी नितीन देसाईंच्या डोळ्यात पाणी होते, या नेत्यांना त्यांनी असे म्हटलेले की- माझं स्वप्न वाचवा. भाजपचे खासदार, स्टार प्रचारक असणाऱ्या सनी देओल यांना एक न्याय आणि आमच्या नितीन देसाईंना एक न्याय, असं का? तुम्ही देसाईंना मरू दिलं, त्यांच्या स्टुडिओचा लिलाव होऊ देताय, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या