‘अजुनी यौवनात मी, अजूनही मुख्यमंत्री मी’; संजय राऊतांचा फडणवीसांच्या खोचक टोला!

‘अजुनी यौवनात मी, अजूनही मुख्यमंत्री मी’; संजय राऊतांचा फडणवीसांच्या खोचक टोला!

मुंबई l Mumbai

माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'मला आजही मुख्यमंत्री (Chief Minister) असल्यासाखेच वाटते', असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

काल नवी मुंबईतील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खोचक टीकाटिप्पणी सुरू आहे. त्यातच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

'लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी. असं एक नाटक रंगमंचावर गाजलंय. ते चिरतरुण नाटक होतं. तसं अनेकांना वाटतं की अजूनही यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री. आम्हालाही कधीकधी दिल्लीत गेल्यावर वाटतं आमचाच पंतप्रधान होणार, असा खोचक टोला संजय राऊत यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांनी फडणवीसांची बाजू सावरून धरताना त्यांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वाक्याचा नेहमीप्रमाणं चुकीचा अर्थ लावला गेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की, जनता अजूनही मी मुख्यमंत्री असल्याप्रमाणेच माझ्याकडून अपेक्षा करते. मराठवाड्याच्या दौऱ्यात त्यांना तसं जाणवलं होतं. गावागावात लोक म्हणत होते की, साहेब तुम्ही हवे होता. त्यावरूनच लोकांमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं ते म्हणाले होते, असं पाटील यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.