Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशीतल म्हात्रेंच्या व्हिडिओवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “तुमची पापं लपवण्यासाठी...”

शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “तुमची पापं लपवण्यासाठी…”

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक प्रकाश सुर्वे यांच्यासोबतचा रॅलीमधील व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील ‘मातोश्री’ नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता राजकारण तापले आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला आपल्या भाषेत उत्तर दिलं आहे. इतकेच नव्हे तर संबंधित व्हिडिओत तथ्य आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. ते आज सकाळी (सोमवारी) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गोदावरीत चार तरुण बुडाले; एकाचा मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरु

संजय राऊत यांनी मला या व्हिडिओबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले. आज सकाळी असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. पण या व्हिडिओशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचं राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, याचा आमच्याशी संबंध नाही.

Air India च्या विमानात प्रवाशाचा धिंगाणा! सिगारेट प्यायला, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला अन्…

पण सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत. व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करा. तो व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा तर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. यावर आता शिंदे गट आणि शीतल म्हात्रेंकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रंगपंचमीचा रंग बेरंग! शेततळ्यात पडून दोन लहानग्या भावांचा दुर्दैवी मृत्यु

शीतल म्हात्रे काय म्हणाल्या?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शीतल म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.

शितल म्हात्रे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलो. तेव्हापासून आम्ही ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. तरी देखील आम्ही उत्तर दिलं नाही. मात्र ज्या पद्धतीने व्हिडीओ काढून त्यावर गाणं टाकून ते मातोश्री फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलं. ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकारी आणि पेजेसवर ते व्हायरल करण्यात आल्याचं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं.

रंग खेळण्याच्या बहाण्याने फॉरेनरसोबत अश्लील वर्तन, Video Viral

स्त्रिच्या कामावर बोट ठेवायला जागा नसेल तर चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात येता. यापूर्वी घोसाळकर यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरी ठाम राहिले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितलं होतं. पण ऐकल नाही. मात्र कालच्या घटनेनंतर सर्वात आधी मला मुख्यमंत्री शिंदेंचा फोन मला आला. त्यांनी सांगितलं, घाबरू नको मी तुझ्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे शिंदे म्हणाल्याचंही म्हात्रे यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या