निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे 'पुष्पा' स्टाईल ट्विट चर्चेत

निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे 'पुष्पा' स्टाईल ट्विट चर्चेत

मुंबई | Mumbai

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्यावरील कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

प्रवीण राऊत यांच्यावरील कारवाईनंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुष्पा चित्रपटातील 'झुकेंगे नहीं' हा डायलॉग मारत टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, 'आधी आमिष दाखवले, ऑफर्स दिल्या. मग घाबरवले, धमकावले पण आम्ही झुकलो नाही. नंतर कुटुंबाला धमकावले. आम्ही दुर्लक्ष केले, जाऊ दिले. त्यानंतर केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच २०२४ पर्यंत चालेल.. पण आम्ही कधीच झुकणार नाही!', असे संजय राऊत म्हणाले. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले आहे.

निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे 'पुष्पा' स्टाईल ट्विट चर्चेत
PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

ईडीच्या पथकाने मंगळवारी प्रवीण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. त्यांची अनेक तास चौकशी केली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने राऊत यांना अटक केल्याची माहिती आहे.

निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे 'पुष्पा' स्टाईल ट्विट चर्चेत
PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ 'श्रीवल्ली' पाहिलीत का?

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (Patra chawl land scam case) प्रवीण राऊत यांच्याविरोधात ईडीने अटकेची कारवाई केली आहे. १ हजार ३४ कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगण्यात येत आहे. एचडीआयएल रिअल इस्टेट या कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यात एक हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत यांचा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.

निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे 'पुष्पा' स्टाईल ट्विट चर्चेत
'डिजिटल' आणि 'क्रिप्टो'करन्सीमधील फरक काय?, वाचा...

अधिक माहितीनुसार, एचडीआयएल (Housing Development Infrastructure Limited) या कंपनीची उपकंपनी असलेल्या गुरूआशिष कंस्ट्रक्शन (Guruashish Constructions) कंपनीला म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने एफएसआय घोटाळ्यात मदत केल्याप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत आहे. काही वर्षांपूर्वी गोरेगावच्या सिद्धार्थ नगरातील पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरूआशिष कंस्ट्रक्शनतर्फे करण्यात येणार होते. काही वर्षांपूर्वी सदनिका न बांधताच फसवणूक करून एफएसआय विकण्यात आल्याचे समोर आले होते.

निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे 'पुष्पा' स्टाईल ट्विट चर्चेत
'प्रियांका चोप्रा-निक जोनास'प्रमाणेच 'या' सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com