कधीही निवडणुका घ्या, सत्ता शिवसेनेचीच : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपचा (BJP) डाव असून शिवसेना बाध्य होत नसल्याने शिवसेनेविरुद्ध कुरघोड्या करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. शिवसेना (Shivsena) राज्यात एकसंघ असून येणाऱ्या निवडणुकीसाठी (Election) सज्ज आहे...

नाशिक जिल्हा चर्चेचा केंद्र बिंदू राहिला आहे. नाशिकचे सर्व माजी नगरसेवक शिवसेनेसोबतच आहेत. कधीही निवडणुका झाल्या तरी सत्ता शिवसेनेचीच येणार आहे. शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागली आहे. नव्या ताकदीने आम्ही उभे असल्याचा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे.

पक्षबांधणीसाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मी काल, आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहे. आज ग्रामीण दौरा आहे, उद्या शहराचा दौरा आहे. जिल्ह्यातल्या शिवसैनिकांशी माझी चर्चा झाली. मालेगाव, नांदगावमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मला भेटून गेले. सगळे नगरसेवक आमच्यासोबत आहे. महापालिका निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

संजय राऊत
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

बंडखोरांबाबत संजय राऊतांना विचारणा केली असता ते म्हणाले की, बंडखोर प्रत्येकवेळी आरोप बदलत राहिलेत, बंडखोर पुन्हा निवडून येणार नाहीत. संजय राऊत यांनी नुकसान केले हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. कृत्रिम वादळ पूर्णपणे शांत होईल.

संजय राऊत
तुझाही 'मुसेवाला' करू; पीएम मोदी चित्रपटाच्या निर्मात्याला धमकी

राज्याच्या राजकारणात चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले आहेत. सरकार बेकायदेशीर आहे. ११ आमदारांचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी सरकार स्थापनेची घाई केली. मागील अडीच वर्षात अध्यक्षपद निवडीसाठी परवानगी न देणाऱ्या राज्यपालांनी न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता अध्यक्ष निवडीला परवानगी दिली. या कृती बेकायदेशीर आहेत, असेही ते म्हणाले.

धनुष्यबाण चिन्हाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, धनुष्यबाण हा शिवसनेनेचाच आहे, आणि शिवसेनेचाच राहिले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com