Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदेंनी खंजीर खुपसला म्हणून मोदींनी पाठ थोपटली का?; राऊतांचा सवाल

शिंदेंनी खंजीर खुपसला म्हणून मोदींनी पाठ थोपटली का?; राऊतांचा सवाल

दिल्ली | Delhi

नागपूर ते मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीवर थाप दिली, ती शिवसेना फोडल्याबद्दल शाब्बास अशी असावी का? जे औरंगजेब, अफजलखानाला जमले नाही, जे आम्हाला जमले नाही, तो खंजीर तुम्ही खूपसून दाखविला असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला लगावला.

ठाकरे गट बिट हे काही आम्ही मानत नाही, शिवसेना म्हणजे ठाकरे, बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव जिथे तिच खरी शिवसेना आहे. शिंदेंचा गट आपण म्हणू शकतो असे म्हणत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर मेहरबाणी म्हणून त्यांना वेगळा गट आणि चिन्ह दिले गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या