Maharashtra Karnataka Border Issue : मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला कुलुप का?; संजय राऊतांचा हल्लाबोल

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद कमालीचा पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला इशारा दिला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसत आहे आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचंच. ते आक्रमकपणे त्यांची बाजू मांडत आहे. पण आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? ते काहीही का बोलत नाहीत? त्यांच्या तोंडाला कुलुप का?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याशी महाराष्ट्राला पडलेला नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात? मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत कुठे आहेत, हा प्रश्न आहे. कर्नाटकच्या प्रश्नावरती महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेला नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटले आहेत. मिंदे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत, असं राऊत म्हणालेत.

यावेळी संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. भाजपकडून राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान राज्यपाल सारख्या पदावरील व्यक्तीकडून करण्यात येत आहे. तरीही भाजप गप्प आहे. महाराष्ट्र विरोधी ते आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते अकलेचे कांदे आहेत, असे ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *