संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप; म्हणाले,....

संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप; म्हणाले,....

मुंबई | Mumbai

भाजपा (bjp) नेते किरीटी सोमय्या (kirit somaiya) आणि शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अशातच संजय राऊत दिवसेंदिवस सोमय्यांवर नवनवे आरोप करत आहेत. सोमय्या विरुद्ध राऊत या वादात आज राऊतांनी पुन्हा एकदा सोमय्यांविरोधात नवा आरोप केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला NSEL घोटाळा प्रकरणात चौकशी झालेल्या एका कंपनीकडून देणगी मिळाली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये सोमय्यांवर आरोप करताना म्हटले की, 'किरीट सोमय्या यांनी NSEL च्या ५६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयाने या प्रकरणात मोतीलाल ओसवाल कंपनीची चौकशी सुरु केली.

स्वतः किरीट चौकशीसाठी कंपनीच्या शिपायाच्या घरी गेले आणि तमाशा केला. यानंतर २०१८ आणि २०१९ अशा सलग दोन वर्षांमध्ये किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवालकडून युवक प्रतिष्ठानसाठी लाखो रुपये घेतले.' .

Related Stories

No stories found.