Thursday, April 25, 2024
Homeराजकीयव्यंगचित्र ट्विट करत संजय राऊतांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

व्यंगचित्र ट्विट करत संजय राऊतांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार व भाजप यांच्यात लढाई पाहायला मिळतेय. दरम्यान मंगळवारी सकाळी शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक दाखल झाले. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयामध्ये ईडीचे पथकाने शोधमोहिम सुरु केली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेत त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. त्यातच आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये सीबीआय आणि इडी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. या व्यंगचित्रात दोन कुत्रे उभे आहेत. त्यातील एका कुत्र्यावर सीबीआय आणि दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. ही दोन कुत्रे महाराष्ट्राच्या वेशीवर उभे आहेत. “थांब, आता नक्की कोणाच्या घरी जायचं आहे ते अजून ठरलं नाहीये”, असं सीबीआय असं लिहिलेला कुत्रा ईडी लिहिलेल्या कुत्र्याला सांगताना दिसत आहे.

संजय राऊत यांच्या या ट्विटनं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. या ट्विटबाबत राऊतांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील सरकारवर प्रेशर टाकला जात. ते होणार हे माहीत आहे. संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. प्रेशर पॉलिटिक्स कोणाला करायचं आहे , त्यांचं आम्ही स्वागत करतो. प्रेशर पॉलिटिक्स जे कोणी करत आहेत त्यांचं स्वागत आहे. जे कोणी हे करत कुठं केलं जातं सर्व आम्हाला माहीत आहे. व्यंगात्मक टीका आहे, ज्याला जे कळलं ते समजून घेतील,” असा टोला त्यांनी भाजपला मारला.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मुंबईच्या पाली हिल येथील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने केलेली कारवाई ही बेकायदेशीर होती असा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे अनेक राजकीय नेत्यांनी स्वागत केले. तर काहींनी यावर टिका केली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतसह या निर्णयाचे स्वागत करणा-यांवरही टिका केली आहे. ज्या अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला तिच्या मताशी सहमत आहात का असा सवाल कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर जेव्हा न्यायाधीश वा न्यायालयांबद्दल असभ्य वक्तव्यांमुळे अवमान होतो मग जेव्हा कोणी महाराष्ट्र वा मुंबईबद्दल अशा प्रकारचे भाष्य केले जाते ते बदनामी नाही का असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या