पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?

पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?

मुंबई | Mumbai

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०२ दिवसांनंतर न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (शुक्रवारी) हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl land scam ) संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं तातडीनं पावलं उचलली होती. राऊतांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली ज्यावर आज काय निर्णय येणार याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे.

संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टानं ईडीला धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com