Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यात्यांच्याकडून जरा निष्ठेच्या चार गोष्टी शिका; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

त्यांच्याकडून जरा निष्ठेच्या चार गोष्टी शिका; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई | Mumbai

गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली. या भेटीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, मनोहर जोशी (Manohar Joshi) आणि लीलाधर डाके (Liladhar Dake) हे एक कडवट शिवसैनिक म्हणून कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले.

नाशिक जिल्हा परिषदेचे ‘असे’ आहे गट आरक्षण; वाचा सविस्तर

अनेक वादळात, संकटात शिवसेनाप्रमुख, शिवसेनेबरोबर त्यांनी निष्ठेने काम केले आहे. या कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेत (Shivsena) सत्ता आणायची आहे. पण ही सत्ता मिळेल त्या मार्गाने आणायची नाही. लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चोळमुख ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार; नळाला पाणी आलेले नसतानाही लाटला निधी

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दौरा करणे ही जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. राज्यात ठिकठिकाणी महापूर (Flood) आला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

पेठचे गण आरक्षण जाहीर: ‘या’ जागांवर महिलाराज

अजून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. दिल्लीच्या (Delhi) फेऱ्या वाढल्या असताना त्यातून वेळ काढत राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरणार असतील तर त्यात टीका करण्यासारखे काही नाही, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या