संजय राऊतांचा उदय सामंतांवर हल्लाबोल; म्हणाले, बारसूबाबत शिवसेनेची...

संजय राऊतांचा उदय सामंतांवर हल्लाबोल; म्हणाले, बारसूबाबत शिवसेनेची...

मुंबई | Mumbai

बारसूची (Barsu Refinery Project) जागा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच सुचवली होती. यासंदर्भात त्यांनी मोदींना पत्र पाठवले होते, असा दावा करणाऱ्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे...

संजय राऊतांचा उदय सामंतांवर हल्लाबोल; म्हणाले, बारसूबाबत शिवसेनेची...
नाशिकमध्ये आयकरची सर्वात मोठी कारवाई; तब्बल तीन हजारांहून अधिक कोटींचे घबाड लागले हाती

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन रिफायनरी प्रकल्पावरून (Refinary Project) सरकारवर जोरदार टिका केली. राजापूर (Rajapur) तालुक्यातील बारसू (Barasu) येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत माती सर्वेक्षणाचे काम काल दुपारपासून सुरु झाले आहे.

'कुठला तरी सरकारी कागद फडकवत उदय सामंत यांनी शहाणपणा करु नये. जागेवर जावे आणि लोकांशी बोलावे', असा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला आहे. 'बारसूबाबत शिवसेनेची अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. नाणारला पर्यायी जागा सूचवण्यासंदर्भात एक भूमिका घेतली होती. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये हीच आम्ही भूमिका घेतली होती', असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

संजय राऊतांचा उदय सामंतांवर हल्लाबोल; म्हणाले, बारसूबाबत शिवसेनेची...
अमित शहा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, चर्चांना उधाण

उदय सामंतांनी तेथील स्थानिकांशी चर्चा करावी, असे ही राऊत यावेळी म्हणाले आहे. राणेंनी कोणते प्रकल्प कोकणात आणेल? फॉक्सकॉन प्रकल्प का गेला ते आधी सांगावे. असा सवाल राणेंनी केला. दरम्यान, संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करताना सांगितले होते की उद्योग राहिला पाहिजे रोजगार वाढला पाहिजे आणि या रोजगारात भूमिपुत्रांना स्थान मिळाले पाहिजे. उद्योग जगला तरच कामगार जगेल. उद्योग आला तर रोजगार वाढेल'. यावेळी 'एअरबस महाराष्ट्रबाहेर का गेला?, फॉक्सकॉन-वेदांत बाहेर का गेला? याचे उत्तर सरकारने द्यावे.', असे देखील त्यांनी सांगितले.

संजय राऊतांचा उदय सामंतांवर हल्लाबोल; म्हणाले, बारसूबाबत शिवसेनेची...
कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर खंडपीठात याचिका

मोदींना पत्र देणारेच आंदोलन पेटवत आहे, अशी टीका उदय सामंतांनी यांच्यावर बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन केली होती. बारसूबाबत शेरद पवारांची भेट घेणार असून या मध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचे उदय सामंतांनी यावेळी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com