स्टंटबाजी सोडा अन् लोकांच्या प्रश्नांवर बोला; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

स्टंटबाजी सोडा अन् लोकांच्या प्रश्नांवर बोला; राऊतांचा राज ठाकरेंना टोला
संजय राऊत

मुंबई | Mumbai

धमकीची शेकडो पत्र शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) दररोज येतात. महाराष्ट्रात (Maharashtra) कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडून लोकांच्या प्रश्नांवर बोला, असा टोला शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे....

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या कार्यालयात एक पत्र (Letter) आले आहे. या पत्रात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यांनतर नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांची भेट घेऊन ते पत्र त्यांच्या सुपूर्द केले.

याच मुद्द्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारले असता ते म्हणाले की, राज्यात ठाकरे सरकार (Thackeray Government) असून येथे कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.

अशा धमक्यांचे पत्र शिवसेना भवनात दररोज येत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कुणाची काय हिंमत कुणाला हात लावायची. राज्याचे गृहखाते सक्षम असून प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे स्टंटबाजी सोडा. महाराष्ट्र पूर्णपणे सुरक्षित आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.