Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआमची अयोध्या यात्रा राजकीय नाही तर...; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

आमची अयोध्या यात्रा राजकीय नाही तर…; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | Mumbai

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने (Shivsena) अयोध्येच्या (Ayodhya) लढ्यात प्रत्यक्ष काम केले. आम्ही आयोध्येला जाणार आहोत. त्याची तारीख ठरवू. आमची राजकीय यात्रा नाही तर आमची ही श्रद्धेची यात्रा आहे, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे….

- Advertisement -

आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पाच जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. यावरून शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा; म्हणाले…

ते पुढे म्हणाले की, करोनाकाळात आम्ही अयोध्येला जाऊ शकलो नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि शिवसैनिक सर्वजण आयोध्येला जाणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपने ओवैसींचा वापर केला तसाच महाराष्ट्रातही भाजपने (BJP) हिंदू समाजात काही ओवैसी तयार केले आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन महाराष्ट्रात (Maharashtra) फुट पाडण्याचे आणि दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता झानी आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या