Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या"एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर..." संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर खोचक टीका

“एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर…” संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर खोचक टीका

मुंबई | Mumbai

सध्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. याबाबत सविस्तर सुनावणी घेऊन निर्णय होईल, असे राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) मुलाखतींमध्ये सांगितले आहे. आता या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल नार्वेकरांना लक्ष्य केले आहे…

- Advertisement -

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेला एक प्रतिष्ठा आहे. ते घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने निष्पक्ष पद्धतीने न्याय करायचा असतो. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अधिवेशन सध्या सुरु नाही. पण अध्यक्ष परदेशात किंवा इथे येऊन अनेक मुलाखती देत आहेत. त्यातून संभ्रम निर्माण होत आहे. यातून प्रकरणावर दबाव निर्माण होतोय की काय, असे आम्हाला वाटत आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली.

Live Updates : कायदेमंत्रीपदावरून किरेन रिजिजू यांना हटवले; आता ‘या’ नेत्याकडे कार्यभार

ते पुढे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यासमोरच्या खटल्याबाबत जाहीर मुलाखती देऊ नयेत असे घटनात्मक संकेत आहेत. न्यायमूर्ती त्यांच्यासमोरच्या खटल्याबाबत आपण काय करणार आहोत, काय करणार नाही अशा मुलाखती देत नाहीत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

‘एसीबी’चे पथक पाहताच खरे स्तब्ध

घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचे हे कर्तव्य आहे. त्यांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. हे सगळे घडले तेव्हा ते तिथेच होते. आधी झिरवळ होते. झिरवळांच्या अध्यक्षतेखालीच राहुल नार्वेकर अध्यक्ष झालेत ना? अभ्यास कसला करताय? एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर ते संपूर्ण प्रकरण २४ तासात उडवून देईल, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या