राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचे टीकास्त्र

राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचे टीकास्त्र

मुंबई | Mumbai

आमदार अपात्रेताचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून रेंगाळला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुनावणी घेण्यास तयार झाले. मात्र त्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे...

संजय राऊत म्हणाले की, राज्यात एक फुल दोन हाफ सरकार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत टाळाटाळ केली. आता त्यांनी आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेऊ असे जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार होते. ते सरकार पाडले. मुख्यमंत्र्यांसह आधी १६ जण आणि नंतर काही अपात्र होते. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार फोडण्यात आले. ते देखील अपात्र आहेत, असे घटना सांगते.

राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचे टीकास्त्र
मोठी बातमी! तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

शिवसेनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगितले आहे. तरीही ज्यांचा पक्षांतर करणे धर्म आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चालढकल करत आहेत. त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

एक वर्षापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. अध्यक्षांनी घटनाबाह्य निर्णय घेतले. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. घटनेवर ज्यांनी काम केले ते देखील सध्याची स्थिती पाहून स्वर्गात अस्वस्थ झाले असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचे टीकास्त्र
केंद्र सरकारची गुड न्यूज! देशातील 'इतक्या' लाख लोकांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com